चीनची अॅपल उत्पादनांवर अधिकृत बंदी

apple
चीनने सुरक्षा कारणास्तव आता अॅपलच्या कांही उत्पादनांवर अधिकृत बंदी घातली असून ही उपकरणे सरकारी कामासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीतून वगळण्यात आली आहेत. त्यात अॅपल आयपॅड व मॅक्सबुकचा समावेश आहे. ही उत्पादने चीनी सरकारच्या खरेदी यादीत जूनपर्यंत समाविष्ट होती. अॅपल आयफोनवर मात्र बंदी घातली गेलेली नाही कारण सरकारी खरेदीत स्मार्टफोन खरेदीची तजवीज नाही असे समजते.

आयपॅड व मॅक्सबुकवरील बंदी मुळे अॅपल चीनमधली सरकारी खरेदीवर बंदी असलेली चौथी परदेशी मोठी कंपनी ठरली आहे. चीनी बाजारात आता या कंपनीलाही मोठ्या अडथळ्यांचा सामना या बंदीमुळे करावा लागणार आहे. चीनच्या सरकारी विभागाने यापूर्वी अमेरिकेच्या सिमँटेक फर्मच्या अँटी व्हायरस सॉफ्टवेअर तसेच रशियाच्या कास्परस्काय लॅब आणि मायक्रोसॉफटच्या विंडोज ८ ला सरकारी खरेदीतून वगळले आहे. ही बंदी मे पासून घातली गेली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment