काँग्रेस करणार भुजबळांवर कुरघोडी

chagan-bhujbal
मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भले विधानसभा निवडणूक एकत्रित लढणे ठरवले असले तरी कुरघोडीचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरुच असल्याचे चित्र दिसत असून मुंबईतील खड्ड्यांचे या कुरघोडीला कारण मिळाले आहे.

या कुरघोडीचे बळी ठरणार आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ. कारण काँग्रेसने भुजबळ यांना मुंबईतील खड्ड्यावरून धारेवर घेतले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतील खड्ड्यांसंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात मुंबई उपनगरातील दिंडोशी उड्डाणपुलावरील ख़ड्डे दोनदा बुजवण्यात होते तरीही पुन्हा या उड्डाणपूलावर खड्डे पडले असून जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करा, अशी सूचनाही या पत्रातून सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. मुख्यमंत्री निर्णय घेण्यास विलंब करतात, अशी टीका राष्ट्रवादीकडून नेहमीच करण्यात येते. त्यामुळे आता रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन काँग्रेस भुजबळांना अडचणीत आणते आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment