इस्लामिक स्टेटवर विमान हल्यांचे ओबामांचे संकेत

obama (1)
इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या सुन्नी दहशतवाद्यांच्या विरोधात कांही ठिकाणी विमान हल्ले करण्याची परवानगी दिली जाईल असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे. हे दहशतवादी जर इरबिल शहराकडे जातील तर ही कारवाई त्वरीत केली जाईल असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. या भागात अमेरिकेचे वाणिज्य दूतावास आणि सैन्य सल्लागार कार्यालय आहे.

इराक आणि सिरीयातील प्रचंड मोठा भाग सुन्नी दहशतवाद्यांनी कब्जात घेऊन तेथे इस्लामिक स्टेट स्थापन केल्याची घोषणा कली आहे. त्यांनी नुकतेच ख्रिश्चन बहुल वस्ती असलेले काराकुष शहरही ताब्यात घेतले आहे. येथील नागरिकांना जिवाच्या भीतीने पलायन करावे लागले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची वेळ आली असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.

Leave a Comment