अमेरिका करणार इराकवर हवाई हल्ले

obama
वॉशिंग्टन – इराकमधील युद्ध आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण इराकमध्ये आयएसआयएस या अतिरेकी संघटनेच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका इराकवर हवाई हल्ले करणार आहे. याबाबत आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘व्हाईट हाऊस’मधून दिले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधील दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी इराकवर हवाई हल्ला करण्याचा आदेश दिला असून अमेरिकेने अखेर इराकमधील हिंसाचार थोपवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहशतवाद्यांच्या ताब्यातील भागावर हल्ला करण्याची परवानगी ओबामा यांनी सैन्याला दिली आहे.

इराकचा बहुसंख्य भाग हा आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला असून त्यांनी अनेक दिवसांपासून इराकमध्ये थैमान घातले आहे, ज्यात आत्तापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

Leave a Comment