अखेर त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

beat
मुंबई – माटुंगा येथील गतीमंद शाळेच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला असून माटुंगा पोलीस ठाण्यात बाल कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माटुंगा परिसरातील गतीमंद शाळेच्या एका शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांना लाकडी छडीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ गुरुवारी प्रसारातीत झाला होता यानंतर शिक्षिकेविराधात पुरावे गोळा केल्यावर तिला अटक केली जाणार आहे.

३० जून रोजी ही घडलेल्या या घटनेचे शाळेसमोर राहणाऱ्या एका पालकाने ही घटना मोबाईलमध्ये शूट केली. त्यानंतर २ ऑगस्टला गतीमंद शाळेच्या पालक-शिक्षक असोसिएशनच्या बैठकीत या पालकाने ही क्लिप दाखवली.

त्यानंतर शाळेच्या संचालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला निलंबित केले आहे. पालकांनी या प्रकरणी बाल कल्याण आयोगाकडेही दाद मागितली आहे.

Leave a Comment