सरपंचांच्या मानधनात होणार भरीव वाढ

chavan
मुंबई – राज्यातील सर्व सरपंचांच्या मानधनात आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

दोन हजारपर्यंतच्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत सरपंचांना आता दरमहा एक हजार रुपये मानधन देण्यात येईल, पूर्वी हे मानधन 400 रुपये होते. आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचांना 1500 रुपये मानधन देण्यात येईल, पूर्वी हे मानधन 600 रुपये होते. आठ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दोन हजार रुपये मानधन देण्यात येईल, पूर्वी हे मानधन 800 रुपये होते. याकरिता शासन 75 टक्के अनुदान देणार आहे.

ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यात देखील वाढ करण्यात आली असून यापुढे 200 रुपये प्रती बैठक असा भत्ता देण्यात येईल, तो यापूर्वी 25 रुपये एवढा होता. वर्षात फक्त 12 बैठकांसाठी हा भत्ता मिळेल. यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येईल. मानधन वाढ व बैठक भत्ता वाढीपोटी शासनावर 66 कोटी रुपये इतका वाढीव भार पडणार आहे.

Leave a Comment