राष्ट्रवादीच्या वाटेवर राणेंचे कट्टर समर्थक

rane
रत्नागिरी – काही दिवसच झाले असतील नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेऊन, पण नारायण राणे यांच्या कोकणातील एका कट्टर समर्थकाने त्यांची साथ सोडली आहे.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राजन तेली यांनी. तेली हे सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादीकडून तेली यांना सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment