राजीव गांधी घरकुल योजनेतील अनुदान वाढवले

awas
मुंबई : ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांकरिता राबवण्यात येणार्‍या राजीव गांधी घरकुल योजनेतील अनुदान वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापुढे ९५ हजार रुपये इतके अनुदान प्रति घरकुल देण्यात येईल. यापूर्वी हे अनुदान ६८ हजार ५00 रुपये इतके होते.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक-१ सुधारित असे नाव असलेली ही योजना आता राजीव गांधी घरकुल योजना, या नावाने ओळखण्यात येईल आणि तिला ३१ मार्च २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा ५ हजार रुपये इतका ठेवण्यात येईल. तसेच या योजनेची व्याप्ती वाढवून ती क वर्ग नगर परिषदांना देखील लागू करण्यात येईल.

Leave a Comment