नवे भाकीत ; भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये एकच चलन

currancy
मुंबई – नरेंद्र मोदी हे पुढील दहा वर्षे देशाचे पंतप्रधान राहतील तसेच नजीकच्या भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये एकच चलन होईल, अशी भविष्यवाणी अनेक नामांकित उद्योगपतींचे सल्लागार आणि विख्यात भविष्यवेत्ते विमल सिंह यांनी केली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सध्याचे संबंध पाहता चलनाची बाब अनेकांना अशक्य घटना वाटेल. मात्र सिंह यांनी यापूर्वी वर्तवलेले अनेक अंदाज अचूक ठरलेले आहेत. त्यामुळेच सिंह यांच्या या अंदाजाकडे अनेकांचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या सिंहासन सिंह यांचे विमल सिंह हे नातू आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी सुरुवातीला घरच्या लोकांबाबत आणि नंतर जगभरातील व्यक्ती आणि घटनांबाबत अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. व्यक्त केलेले अंदाज खरे ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर सिंह यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि या विषयात प्राविण्य मिळवले. भारत आणि पाकिस्तानात सध्या ‘रुपया’ हेच चलन असले तरी त्याचे आंतरराष्ट्रीय मूल्य वेगवेगळे आहे.

Leave a Comment