खुशखबर; केंद्र सरकार देणार शैक्षणिक कर्जावर अनुदान

student
नवी दिल्ली – केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी आज लोकसभेत मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशातील शैक्षणिक कर्जावर अनुदान मिळणार असल्याची माहिती दिली.

अनुसूचित जाती-जमातींना शिक्षणासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती या दोन्ही वेगवेगळ्या असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने हेपतुल्ला यांनी सांगितले.

केंद्र सरकारने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘पढो परदेश’ ही योजना असल्याचे हेपतुल्ला म्हणाल्या. या समाजातील जे गरीब घरातील विद्यार्थी आहे त्यांनाही परदेशात शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे.

वरील समाजातील ज्या कुटुंबाचे उत्त्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेतून विद्यार्थ्यांना मास्टर्स, एम.फिल आणि पीएचडी मधील शिक्षण घेता येईल असे त्यांनी सभागृहात सांगितले.

Leave a Comment