एकनाथ ठाकूर यांचे दीर्घ आजाराने निधन

eknath
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचे आज सकाळी मुंबईच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी दीर्घआजाराने निधन झाले.

गेली अनेक वर्षे सहकारी बँकांच्या क्षेत्रात एकनाथ ठाकूर कार्यरत होते. देशातली सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून त्यांनी सारस्वत बँकेला लौकिक मिळवून देण्यास त्यांचा मोठा हात होता. ठाकूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकींगची स्थापना केली.

सारस्वत बँक ही रिझर्व्ह बँकेकडून संपूर्ण देशभरात शाखा उघडण्याची परवानगी असणारी एकमेव बँक असून ज्या काळात देशातल्या आणि राज्यातल्या अनेक सहकारी बँकांच्या चळवळीला घरघर लागली होती. त्याच काळात एकनाथ ठाकूर यांनी सारस्वत बँकेची धुरा समर्थपणे सांभाळली आणि बँक नावारूपाला आणली.

त्यांच्या निधनाने मराठी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment