रशियाने सर्वाधिक हॅकिंग केल्याचा होल्ड सिक्युरिटीचा दावा

russia
अमेरिकन इंटरनेट सुरक्षा कंपनी होल्ड सिक्युरिटीने रशियाने हॅकींगच्या इतिहासातील सर्वात मोठे हॅकींग केल्याचा आरोप केला आहे. रशियन हॅकर गटाने ५० कोटी ईमेल पत्त्यांमधून किमान सव्वा अब्ज युजरनेम व पासवर्ड चोरी केले असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. रशियन हॅकर्सने ४ लाख २० हजार वेबसाईटवरून हा डेटा चोरी केला आहे असा आरोप या कंपनीने केला आहे.

रशियाने चोरी केलेल्या डेटामध्ये अनेक बड्या इंटरनेट कंपन्यांसह प्रत्येक प्रकारच्या वेबसाईटचा समावेश आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या डेटाबेस चोरीचा तपास करण्यासाठी होल्ड सिक्युरिटीने स्वतंत्र इंटरनेट सुरक्षा तज्ञांची नेमणूक केली होती आणि त्यांनी सतत सात महिने तपास घेतल्यानंतर या चोरीसंबंधीची माहिती मिळाली आहे. अन्य एका इंटरनेट तज्ञाच्या मते या चोरीची माहिती कांही बड्या कंपन्यांना अगोदरपासूनच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रशियन हॅकर गटाने प्रथम हॅकरांकडून डेटाबेस मिळविला आणि त्यानंतर सोशल मिडीया, ईमेल सेवा व अन्य वेबसाईटवर स्पॅम पाठवून डेटा चोरी केली आहे.

Leave a Comment