म्हातारे झाले आहेत रतन टाटा – अमित मित्रा

tata
कोलकाता – पश्चिम बंगालमधील औद्योगिकीकरणाबाबत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या विधानावरुन पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी जोरदार टीका करीत टाटा हे म्हातारे झाले असून सध्या काय घडत आहे हे ते का समजू शकत नाहीत हे मला माहित नाही असे मित्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाचा विकास होत नसल्याचे विधान रतन टाटा यांनी बुधवारी एका चर्चासत्रादरम्यान केले होते.

मित्रा यांनी टाटा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. टाटा समूहाच्या टीसीएसमुळे राज्यात लवकरच २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच अनिल अंबानी समूह, इमामी या दोन्ही उद्योगसमूहांकडून राज्यात सिमेंट उद्योग उभारण्यात येणार आहे. तसेच टाटा समूहाच्या टाटा मेटालिक्सनेही आपला विस्तार वाढवण्यासंबंधीचे पत्र राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती मित्रांनी यावेळी दिली.

Leave a Comment