मुंबईतील खड्डे गणेशोत्सवापूर्वी होणार भुईसपाट!

road
मुंबई – अवघे काही दिवसच उरले गणपतीचे आगमन व्हायला आणि मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत महापौर सुनील प्रभू आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि यांच्यात चांगलीच जुंपली.

समितीने गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी केली असून मुंबईतील सर्व खड्डे महापौरांनी २३ ऑगस्टच्या आत बुजवण्याचे आश्वासन समितीला दिले आहे. यावेळी पालिकेच्या कारवाईची वाट न पाहाता चक्क मुंबईच्या रस्त्यांवरच्या ३ हजार खड्ड्यांचे सार्वजनिक गणेशोत्सव समितीनेच ऑडिट करून महापौरांना दिले.

Leave a Comment