माकडाने काढलेल्या सेल्फीवरुन कॉपीराईटचा वाद

selfi
न्यूयॉर्क – आजवर आपण स्वत:चे सेल्फी काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड देखील केले त्याला कोणी आक्षेप घेतला नाही पण, इंडोनेशियातील माकडाच्या सेल्फीच्या कॉपीराईटवरुन आता वाद निर्माण झाला आहे.

याबाबत विकिपीडियाचे म्हणणे आहे की सेल्फी माकडाने काढल्याने फोटोचे कॉपीराईट माकडालाच दिले जातील आणि छायाचित्रकाराने माकडाच्या हाती माझा कॅमेरा असल्याने या फोटोचे कॉपीराईटही माझ्याकडेच असायला पाहिजेचा युक्तिवाद केला आहे. त्यामुळे विकिपीडियाविरोधात या छायाचित्रकाराने ३० हजार डॉलर्स दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुलावेसी येथे छायाचित्रकार डेव्हीड स्लॅटर हे फिरायला गेले होते. त्यावेळी मकॅक्यू जातीच्या एका माकडाने स्लॅटर यांचा कॅमेरा हिसकावला व तिथून पळून गेला. या माकडालाही कॅमेरा हातात आल्यावर सेल्फीचा मोह आवरता आला नाही आणि त्यानेदेखील सेल्फी काढली. त्या कॅमे-यात माकडाने स्वतःचे तब्बल १०० हून अधिक फोटो क्लिक केले. माकडाची ही सेल्फी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. विकीपिडीयानेही माकडाची सेल्फी अपलोड करुन त्या फोटोचे कॉपीराइट माकडाला दिले. मात्र विकिपीडियाच्या या निर्णयावर स्लॅटर यांनी नाराजी दर्शवली आहे. माकडा हा माणूस नसून तो एक प्राणी आहे. त्यामुळे त्याला कॉपीराईट देण्यात काहीच अर्थ नाही असे स्लॅटर यांचे म्हणणे आहे. विकिपीडियाने विनापरवानगी हा फोटो अपलोड केल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे स्लॅटर यांनी सांगितले. यासाठी विकिपीडियावर ३० हजार डॉलर्सचा दावा ठोकणार असल्याचे स्लॅटर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment