भारताचा अर्धा संघ तंबूत

cricket
मुंबई – इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाची चौथ्या कसोटीत वाताहत झाली असून टॉस जिंकून पहिल्यांदा बँटिंग करणाऱ्या भारताने ६५ रन्समध्ये ५ विकेट गमावल्या आहेत.

दुखापतीमुळे तिसरी कसोटी न खेळणाऱ्या इशांतला चौथ्या टेस्टलाही मुकावे लागले आहे. तसेच कॅप्टन धोनीने शमीला बाहेर ठेवताना आर. अश्विनवर विश्वास दाखवला आहे. तसेच मागील काही डावांपासून अपयशी ठरणाऱ्या शिखर धवनऐवजी गौतम गंभीरला संघात घेतले आहे.

आज नाणेफेक जिंकलेल्या भारताने बॅटिंग सुरू करताना ओपनिंग अपेक्षेप्रमाणे गंभीर आणि मुरली विजयने केली. मात्र गंभीर काहीही करू शकला नाही, त्याच्या रूपाने भारताची पहिली विकेट गेली. त्यानंतर मुरली विजय, कोहली आणि पुजारा हे भोपळाही न फोडता आणि अजिंक्य रहाणे तंबूत परतल्याने भारताची ६५ रन्स मध्ये ५ विकेट अशी अवस्था झाली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment