धक्कादायक…. अल्पवयीन मुलीवर न्यायाधीशाकडून बलात्कार

rape
पुणे – देशभरात आजवर अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पण ज्यांच्याकडे यावर न्याय मागण्यास जातो त्यांनीच असे कृत्य केले तर तळपायाची आग मस्तकाला गेल्या शिवाय राहत नाही. असेच काही घडले आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पठार येथे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

बलात्काराचा आरोप न्यायदंडाधिकारी नागराज शिंदे यांच्यावर आहे. पुण्याच्या न्यायालयात शिंदे याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment