गतीमंद मुलाला शिक्षिकेकडून बेदम मारहाण

beat
मुंबई – मुंबईतील एका शिक्षिकेने गतीमंद विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळे जवळ राहणाऱ्याने एका दक्ष नागरीकाने काढलेल्या व्हिडीओ क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला.

मुंबईच्या माटुंगा परिसरात असलेल्या गतीमंद मुलांच्या शाळेत ही घटना घडली असून या शिक्षिकेकडून गतीमंद मुलाला छडीने बेदम मारहाण करण्यात येत होती.

शाळे जवळ राहणाऱ्याने एका दक्ष नागरीकाने याची व्हिडीओ क्लिप काढून हा प्रकार उघडकीस आणला. मात्र, अद्याप या शिक्षिकेवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Leave a Comment