इन्फोसिसतर्फे बाय बॅक ऑफर येण्याची शक्यता

infosys
बंगलोर – भारतातील दोन नंबरची सॉफ्टवेअर सेवा पुरविणारी इन्फोसिस त्यांच्या इतिहासात प्रथमच शेअर बायबॅकचा पर्याय देऊ करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. १९९३ साली भारतीय शेअर बाजारात ही कंपनी लिस्टेड झाली आहे.

कंपनीचे सर्वेसर्वा नारायणमूर्ती यांच्या कारकीर्द कंपनीची मोठी भरभराट झाली मात्र गेली कांही वर्षे वरीष्ठ पदाधिकारी अणि कर्मचारी कंपनीतून बाहेर पडल्यामुळे गुंतवणुकदारांचा कंपनीवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. गुंतवणुकदारांचा गमावलेला विश्वास परत मिळवावा यासाठी शेअर बायबॅकची योजना जाहीर करण्याची मागणी कंपनीतील अन्य वरीष्ठांनी नव्याने नियुक्त झालेले सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांच्याकडे बोर्ड मिटींगमध्ये केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कंपनीने बायबॅक ऑफर दिली तर कंपनी ३८०० रूपयांनी शेअरची पुर्नखरेदी करेल असेही समजते. जून २०१४ च्या तिमाहीत कंपनीची मालमत्ता २९७४८ कोटींची आहे. यामुळे शेअर बायबॅकचा कंपनीच्या बँकबॅलन्सवर फारसा परिणाम होणार नाही असे तज्ञांचे मत आहे. कंपनीने ११ हजार कोटीं रूपये मूल्यांचे शेअर बायबॅक करावेत यासाठी कंपनीतील वरीष्ठ आग्रही असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment