अब्जाधीशांच्या संख्येत भारत आठव्या स्थानावर

population
मुंबई – गेल्या कांही वर्षात जगभरातच अब्जाधीश आणि करोडपतींची संख्या वेगाने वाढत चालली आहे. वर्ल्ड हेल्थवेल्थ इंडेक्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताचा अब्जाधीशांच्या यादीत जगात आठवा क्रमांक असून आजमितीला भारतात १४८०० अब्जाधीश आहेत. या यादीत भारताने रशिया, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सला मागे टाकले आहे.

या यादीत १ कोटी डॉलर्स अथवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असलेल्या लोकांचाच समावेश करण्यात आला आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारतात मुंबई अव्वल स्थानी आहे. एकट्या मुंबईतच २७०० अब्जाधीश आहेत. जर्मनीच्या म्युनिक शहरातही इतकेच अब्जाधीश आहेत. जगात पहिल्या क्रमांकावर हाँगकाँग असून तेथे १५ हजार अब्जाधीश आहेत. अब्जाधीशांच्या देशपातळीवरील यादीत पहिल्या दहा क्रमांकात अमेरिका, चीन, जर्मनी या देशांचाही समावेश आहे. अब्जाधीशांच्या यादीत गेल्या दहा वर्षात तब्बल ७१ टक्के वाढ झाली असून जगात आजमितीला १.३ कोटी करोडपती तर ४,९५,००० अब्जाधीश आहेत.

Leave a Comment