सौदीत नाही चालणार पाकिस्तान, बांगलादेशची ‘दुल्हन’

bride
रियाध – लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन आणि म्हणतात ना मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी असे असताना देखील सौदी अरेबियातील पुरुषांना आता जोडीदार निवडताना अधिक विचार करावा लागणार असून पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या चार देशातील महिलांशी सौदी अरेबियातील पुरुषांना विवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अरब देशांमध्ये अन्य देशांतून नोकरीसाठी येण्याचे प्रमाण अधिक असून अशा प्रकारे येणा-यांना रोखण्यासाठीच हे बंधन घालण्यात आल्याचे एका पोलिस अधिका-यांने म्हटले आहे. पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या देशांतील महिलांचे सध्या सौदीमध्ये प्रमाण पाच लाख इतके असून यापुढे सौदीमधील पुरुषांना परदेशी महिलेशी लग्न करायचे असल्यास त्यासाठी विशेष मंजूरी घ्यावी लागेल असे डॉनऑनलाइन या स्थानीक वृत्तपत्राने म्हटले आहे.

Leave a Comment