सीसीटीव्हीसाठी नियमावली; नवी मुंबई ठरणार पहिले शहर!

cctv
ठाणे – नवी मुंबईतील सार्वजनिक परिसरात सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात सिडकोकडून आदर्श नियमाली तयार करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे नवी मुंबईतल्या सार्वजनिक परिसरांवर लक्ष ठेवले जाणार आहे. सीसीटीव्हीसाठी नियमावली असणारे नवी मुंबई हे देशातील पहिले शहर असणार आहे.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहे, हॉटेल्स, शाळा, रुग्णालये, हाऊसिंग सोसायटी, औद्योगिक विभाग, गोदामे, वेअरहाऊसेस आणि इतर व्यवसायिक तसेच सरकारी इमारतींजवळ सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी सिडकोने दिली.

सध्या नवी मुंबईत महानगर पालिकेकडून २५० कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. सीसीटीव्हीबाबतच्या या नव्या नियमावलीस सरकार तसेच खाजगी संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. लवकरच ही नियमावली नवी मुंबई पोलिस, सिडको आणि राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती सिडकोने दिली

Leave a Comment