स्पेनच्या झेव्हीने घेतली निवृत्ती

xvil
माद्रिद – आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून स्पेनच्या 34 वर्षीय झेव्ही हेर्नांडेझ या फुटबॉलपटूने पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

झेव्ही हा बार्सिलोना क्लबकडून खेळत होता तर आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात स्पेनचा हुकमी स्ट्रायकर म्हणून झेव्हीकडे पाहिले जाते. 2010 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया स्पेन संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर झेव्हीने स्पेनला दोनवेळा युरोपियन चॅम्पियनशिप मिळवून दिली होती. 2008 आणि 2012 साली स्पेनने युरोपियन फुटबॉल स्पर्धा जिंकल्या. स्पेनच्या या यशामध्ये झेव्हीचे योगदान महत्त्वाचे होते.

Loading RSS Feed

Leave a Comment