मोदी करणार नागपूर मेट्रोचे भूमीपूजन

modi
नागपूर : मुंबई मेट्रोनंतर आता महाराष्ट्रातल्या दुसऱ्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन या महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी २१ ऑगस्टपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने या प्रकल्पाचे सर्वेक्षण केले असून नागपुरातील हा मेट्रो प्रकल्प 41 किलोमीटरचा असणार आहे. तर उत्तर-दक्षिण मार्गावर १८ ठिकाणी आणि पूर्व-पश्चिम मार्गावर १९ थांबे असतील.

या प्रकल्पासाठी काही जागेचे भूसंपादन करण्याबरोबरच ९ हजार कोटी खर्चाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यातील खर्चाचा ५० टक्के भर बॅंक, केंद्र सरकार २० टक्के तर राज्य सरकार २० टक्के सहभाग उचलणार असून उर्वरित खर्च नागपूर महापालिका उचलणार आहे.

Leave a Comment