मुंबईतील २१ जागा लढविणार शिवसेना

shivsena
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कुठल्या जागेवरून रिंगणात उतरणार यासाठी चाललेल्या रस्सीखेचीत सेनेने सरशी केली असून महायुतीचा मुंबईतील जागावाटपाचा फार्म्युला तयार झाला आहे. या जागावाटपात मुंबईतील ३४ जागांपैकी शिवसेना २१ तर भाजप ११ जागांवर आणि आरपीआयला दोन जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आणि भाजप काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याच्या विचारात असून कुलाबा, मुंबादेवी, सायन कोळीवाडा, कलिना, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, चांदिवली या मतदारसंघात अदलाबदल करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत प्रयत्न सुरू आहेत.

या जागावाटपात आठवले गटाला फक्त दोन जागा मिळाल्याने आरपीआय नाराज आहे. १० जागांची आरपीआयकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कमीत कमी ५ जागा मिळतील अशी आशा आरपीआयला होती. प्रत्यक्षात मात्र, फक्त दोनच जागा मिळाल्याने आरपीआय नाराज आहे.

कोण कोणत्या मतदार संघात
शिवसेनेचे मतदारसंघ – मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वडाळा, धारावी, माहीम-दादर, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, अंधेरी पूर्व-पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व -पश्चिम, गोरेगांव, दिंडोशी, मागाठाणे, दहिसर, चांदिवली, अणुशक्ती नगर, शिवाजी नगर, विक्रोळी, भांडूप

भाजपचे मतदारसंघ – कुलाबा, शीव -सायन कोळीवाडा, वांद्रे पश्चिम, कलिना, मालाड पश्चिम, चारकोप, कांदिवली, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मुलूंड

आरपीआयचे मतदारसंघ – कुर्ला नेहरूनगर, चेंबूर.

Leave a Comment