भारताचा एकदिवसीय संघ जाहीर, युवराज संघाबाहेर

sandeep-patil
मुंबई – सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी ट्वेण्टी संघाची आज घोषणा करण्यात आली असून युवराज सिंगला संघात जागा बनवता आली नसून टीम इंडियात तीन नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघात मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी, केरळचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन आणि रेल्वेचा लेग स्पिनर करण शर्मा या तिघांची संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड केली आहे. वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला याला घोट्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे – महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, स्टुअर्ट बिनी, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी, अंबाती रायडू, उमेश यादव, धवल कुलकर्णी, संजू सॅमसन, करण शर्मा

Loading RSS Feed

Leave a Comment