ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचे निधन

smita
मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर मराठी सिनेसृष्टीद्वारे प्रेक्षकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती, पण अशा या कलाकाराचे वयाच्या ५९ वर्षी मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

स्मिता तळवलकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ठेवण्यात येणार असून दुपारी दादर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

आपल्या कारकीर्दीला प्रथम दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता तळवलकर यांनी सुरूवात केली. त्यानंतर १९८६ मध्ये ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘गडबड घोटाळा‘ असे दोन चित्रपट केले. त्यांनी ‘अस्मिता चित्र‘च्या बॅनरखाली सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. मराठी चित्रपटांतील त्यांचा कसदार अभिनय रसिकांना चांगलाच भावला. मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता.

८०च्या दशकात त्यांच्या ‘कळत नकळत‘ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते करण्यात आले होते त्यानंतर त्यांच्या ‘तू तिथे मी‘ (१९९८) या चित्रपटाला देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांचे प्रमुख्याने ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथे मी’, ‘सातच्या आत घरात’ हे चित्रपट आणि ‘अवंतिका’, ‘ऊन पाऊस’ या मालिका विशेष गाजल्या.

Leave a Comment