जळगाव जिल्ह्यात ११ जागा सेनेला घेवूनच लढविणार

shivsena
जळगाव – जळगाव जिल्ह्यात युतीच्या माध्यमातून विधानसभेच्या सर्व अकरा जागा लढविण्यात येणार आहेत. या सर्व जागा जिंकण्याचा आपला प्रयत्न राहील. तसेच जिल्ह्यात शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविली जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा असून या सर्व जागा युतीच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले. जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन यांना पाठिंबा देणार काय असा प्रश्न केला असता ‘मला शिवसेनेचा धनुष्यबाण माहित आहे, त्याला मी ओळखतो. खाविआ, पतंग-विमान वगैरे ओळखत नाही. ही माझी पूर्वी भूमिका होती ती आजही कायम आहे.

पक्षाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निरीक्षक पाठवला आहे. राज्याचा संपूर्ण सर्व्हे करण्याचे काम खाजगी एजन्सीजकडे दिले गेलेले आहे. या बाबतचा रिपोर्ट १५ ऑगस्टपूर्वी येईल, अशी माहिती खडसे यांनी दिली.

Leave a Comment