कोयना धरण; तीन टीएमसीने पाणी साठ्यात वाढ

koyna
कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्‍वर परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धरणात येणार्‍या पाण्याची आवक ३६ हजार क्युसेक झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात पुन्हा एकदा तब्बल तीन टीएमसीने वाढ झाल्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा ८१.७२ टीएमसी झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १२३ (एकूण ३५0९ मि.मी.), नवजा २0१ (४३५९ मि.मी.), महाबळेश्‍वर २४७ (एकूण ३३९५ मि.मी.), पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणार्‍या पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याची आवक रविवारी सुमारे १९ हजार क्युसेक इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन ती प्रतिसेकंद ३६,६९0 क्युसेक झाल्यामुळे धरणाच्या जलपातळीत तब्बल तीन टीएमसीने वाढ झाली आहे.

Leave a Comment