एकदा निर्णय घेतला की माघार नाही; अजित पवार

ajit-pawar
परभणी: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या आठ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १४४ जागा मिळाव्यात या निर्णयावर मी ठाम असून एकदा घेतलेल्या निर्णयावर मी माघार घेत नसल्याचे ठणकावून सांगितले परिणामी आघाडीमध्ये राष्ट्रवादीची चाल काय ?हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.

सेलू येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी अशीच भावना कार्यकर्त्यांची आहे. मात्र आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. वादळी वारे, पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मोठी मदत करण्यात आली. प्रशासनाला तत्काळ पंचनामा करण्यास सांगितले होते. गारपीट मार्चमध्ये झाली आता ऑगस्ट महिना सुरू आहे. त्यामुळे शासकीय मदतीपासून वंचित शेतकर्‍यांचे पंचनामे कसे करणार? असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लवासा भविष्यात माळीण होऊ शकते, हा मेधा पाटकर यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक पक्षाने आपआपली तयारी ठेवलीच पाहिजे. महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्रातून दिल्लीला जाणार्‍यांसाठी घर किंवा भवन आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदनात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. गणेशोत्सव हे सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन साजरा करतात, ती सार्वजनिक बाब असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment