आयसीसीच्या मानांकनात टीम इंडिया चौथ्या स्थानी कायम

icc
दुबई – इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने तिसरी कसोटी गमविली असली तरी त्यांच्या आयसीसी मानांकनात फरक पडला असून आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकनात टीम इंडियाने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.

द.आफ्रिकेने या ताज्या मानांकन यादीत आपले अव्वल स्थानी विराजमान असून द. आफ्रिकेचा एकमेव कसोटी सामना झिंबाब्वेविरुद्ध हरारे येथे 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर असून पाक 103 रेटिंग गुणांसह तिस-या तर भारत 102 रेटिंग गुणांसह चौथ्या, इंग्लंड 100 रेटिंग गुणांसह पाचव्या, श्रीलंका 95 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

Leave a Comment