मंगळावर जाणारे रोव्हर तयार करणार प्राणवायू

rover
नासातर्फे मंगळावर २०२१ साली पाठविण्यात येणारे रोव्हर मंगळावर ऑक्सिजन बनवू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. हे रोव्हर मंगळाची सात वैज्ञानिक परिक्षणे करणार आहे. भविष्यात मंगळावर माणूस पाठविण्याचा मार्ग सुकर करणे, मंगळावरील जीवसृष्टीचे पुरावे शोधणे, खडकांचे नमुने गोळा करणे अशी कामे हे रोव्हर करणार आहे.

मंगळावर कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण मोठे आहे. त्यापासून प्राणवायू तयार करण्याचे उपकरण या रोव्हरमधून पाठविले जाणार आहे. ४० किलो वजनाचे हे उपकरण असून या रोव्हरसोबत दोन कॅमेरे आणि हवामानाचे परिक्षण करणारी उपकरणेही पाठविली जाणार आहेत.नासाचे प्रशासकीय अधिकारी जॉन ग्रंस्फेल्ड म्हणाले की रोव्हर पाठविण्याचा दिवस आमच्यासाठी रोमांचक असेल. १ टन वजनाचे हे यान पाठविण्यासाठी १.९ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. मात्र या यानातून सध्याच्या क्युरिओसिटीपेक्षा कमी उपकरणे पाठविली जातील. यानातील शिल्लक जागा मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरली जाणार आहे.

नासाची सध्याची यानेही ऑक्सिजन तयार करू शकतात मात्र नव्या मॉस्की उपकरणाच्या सहाय्याने मंगळावर प्राणवायू तयार करण्याचा प्रयोग प्रथमच केला जाणार आहे.

Leave a Comment