फ्लॅपी बर्ड गेम पुन्हा लाँच

flappy
जगभरातील युजरना वेड लावणारा फ्लॅपी बर्डस हा गेम पुन्हा नव्याने लाँच करण्यात आला आहे. मात्र या गेमसाठी अजूनही कांही बंधने आहेत. हा मल्टीप्लेअर गेम अजूनही केवळ अमेझॉन व फायर टिव्हीवरच उपलब्ध केला गेला आहे. त्याची अँड्राईड व आयओएस व्हर्जन येणार की नाही याबाबत कोणताच खुलासा केला गेलेला नाही.

व्हीएटनामी डेव्हलपर डाँग गुएंग याने हा गेम केवळ दोन तीन दिवसांच्या कालावधीत तयार केला होता. १० फेब्रुवारी २०१४ ला तो लाँच करण्यात आला होता आणि अॅप स्टोअरमध्ये तो उपलब्ध करून देण्यात आला होता. अल्पावधीत या गेमने युजरना वेड लावले त्यावेळीच मे महिन्यात मल्टीप्लेअर व्हर्जन लाँच करण्याचा वादा गुएंगने केला होता. मात्र या गेमला लाभलेली लोकप्रियताच त्रासदायक ठरू लागली होती. अनेकांनी या गेमचे कौतुक केले तर अनेकांनी त्यावर टीकाही केली. गुएंगने हा गेम अॅपवरून काढून घेताच युजरनी आत्महत्येच्या धमक्याही दिल्यामुळे हा गेम नव्याने लाँच करण्यात आला असल्याचे समजते.

नवीन गेम फ्लॅपी बर्डस फॅमिली नावाने आणला गेला असून हा खेळण्यास अधिक मजा येईल असा दावा केला जात आहे. मात्र या गेममध्ये पॉईंट मिळविणे सहजसाध्य नाही. पहिले व्हर्जन सुमारे ५ कोटी युजरनी डाऊनलोड केले होते व त्यातून गुएंगला दररोज ५० हजार डॉलर्सची कमाई होत होती. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व युजरना या गेमची चटक लागली होती असेही समजते.

Leave a Comment