आझादी मार्चसाठी इम्रानची मुले पाकमध्ये येणार

imran
इस्लामाबाद – पाकचा माजी क्रिकेटपटू व आता राजकारणात सक्रीय झालेल्या इम्रानखान याची मुले सुलेमान व कासीम १४ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या आझादी मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये येत असल्याचे वृत्त आहे. इम्रानच्या पाकिस्तान ए तेहरीक ई इन्साफ या पक्षातर्फे सरकारवर दबाव आणून मध्यावधी निवडुकांची मागणी करण्यासाठी हा मार्च आयोजित करण्यात आला आहे. सुलेमान आणि कासीम प्रथमच राजकीय कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

इम्रानखान आणि जमीमा गोल्डस्मिथ यांची ही मुले आईसोबत यूके मध्ये राहतात. पाकिस्तानला यापूर्वीही त्यांनी भेट दिली आहे. पाकिस्तानात राजकारणात सर्व कुटुंब उतरण्याची परंपरा जुनी आहे मात्र इम्रानने यापूर्वी मुलांना राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली नव्हती. सुलेमान आणि कासीम अनुक्रमे १८ व १५ वर्षांचे आहेत. त्यांना वडिलांच्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी मिळाल्यामुळे ती पाकमध्ये येत आहेत. सध्याच्या सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या या पक्षाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, निवडणुक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात अशी मागणी केली असून ही मागणी पूर्ण होईपर्यंत आपण इस्लामाबादच्या रस्त्यांवर सहकार्‍यांसह मुक्काम ठोकणार असल्याची घोषणा इम्रानखानने केली आहे.

Leave a Comment