अमेरिका इस्त्रायलला करणार दारूगोळ्यासाठी अर्थसहाय्य

obama
वॉशिंग्टन – आज सकाळी इस्त्रायलला अर्थसहाय्य मिळवून देणा-या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केल्यामुळे इस्त्रायलला आर्यन डोमच्या सुट्टया भागांचे उत्पादन सुरु ठेवता येईल असे व्हाईट हाऊसचे सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले. या क्षेपणास्त्रामुळे इस्त्रायल कमी अंतरावरुन होणारा क्षेपणास्त्र हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणार आहे. यासाठी अमेरिकेने इस्त्रायलला अतिरिक्त सव्वादोन अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे.

अमेरिकेला इस्त्रायलच्या सहकार्याने आर्यन डोम क्षेपणास्त्र रोधी यंत्रणा विकसित केल्याचा अभिमान असून असंख्य इस्त्रायली नागरीकांचे प्राण अमेरिकेच्या आर्थिक मदतीमुळे वाचले आहेत. या मदतीमुळे इस्त्रायलला रॉकेट हल्ल्यापासून आपला बचाव अधिक भक्कम करता येईल असे अर्नेस्ट म्हणाले.

Leave a Comment