सदनातील गणेशोत्सव; भुजबळ करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

bhujbal
मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन सध्या खुपच चर्चेत येत आहे. त्यातच निवासी आयुक्त बिपिन मलिक यांनी सदनात गणेशोत्सवावर घातलेल्या बंदीमुळे नवाच वाद निर्माण झाला असून या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत.

सदनातील गणेशोत्सवाबाबत निवासी आयुक्त बिपिन मलिक यांच्या फतव्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावर गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ देणार नसल्याचे भुजबळ यांनी आपली भूमिकेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आजपर्यंत मलिक यांच्या कार्यपध्दतीबाबत अनेक तक्रारी आल्या असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राज्य शासनाकडून सदनातील गणेशोत्सवासाठी मदत करण्यात येणार असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

Leave a Comment