शिवबंधन अडकले केसरकर, शिवसेनेत डेरेदाखल

deepak-kesarkar
सावंतवाडी: लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांची डोकेदुखी ठरलेल्या राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत डेरेदाखल झाले. हा सोहळा सावंतवाडीत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली राणे आणि कंपनीची यांची दहशत समूळ नष्ट करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले होते आणि आज तो शब्द पाळत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंची आज सावंतवाडीत जाहीर सभा होत आहे. या सभेदरम्यान, दीपक केसरकर आणि त्यांच्या काही समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केसरकरांना शिवबंधन बांधले आहे.

Leave a Comment