लोणावळ्यात जमीनीला गेली तडा

lonvala
लोणावळा – माळीण दुर्घटनेने पूर्ण देशच हादरला असताना, लोणावळा जवळील एका गावात जमीनीला मोठ्या तडा गेल्याने खळबळ उडाली आहे.

मावळ मधील तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी जमिनीत १५० मीटर लांब आणि ६ इंच रुंदीच्या मोठ्या तडा गेल्या आहेत. या भेगांमुळे तुंग गावकऱ्यांत मोठी खळबळ माजली आहे. मावळच्या तहसीलदारांनी गावाची पाहणी केली आहे.

या गावाच्या चोहोबाजूने पवना धरण असून, तुंग किल्याच्या पायथ्याशीच हे गाव आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment