लाचप्रकरणी सुहास खामकरची पोलीस कोठडीत रवानगी

suhas-khamkar
नवी मुंबई – अख्या भारताच्या तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या शरीरसौष्ठवपटू सुहास खामकरला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आज त्याची दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच याप्रकरणी स्पष्टीकरण देताना शरीरसौष्ठवपटू आणि नायब तहसीलदार सुहास खामकर यांने हे सर्व आरोप फेटाळले असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मला यात निष्कारण गोवण्यात आल्याचे म्हटले आहे.

देशासाठी मी आतापर्यंत खेळलो आहे आणि पुढेही खेळेन. अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये फसवून मी संपेन असे अनेकांना वाटेत असेल मात्र हे चुकीचे आहे. यापुढे मी अधिक जोमाने काम करीन, असेही सुहासने स्पष्ट केले.

Leave a Comment