माळीण गाव; वाढतोय मृतांचा आकडा

malin
पुणे – माळीण गाव दुर्घटनेला आठवडा होत आल्याने अजून कोणी ढिगा-याखाली बचावले असण्याची शक्यता अत्यंत धुसर असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला असून, आणखी सहा मृतदेह सापडले आहेत. आता मृतांची एकूण संख्या १३६ झाली आहे.

या परिसरात अनेक मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य पथके येथे शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार १३६ मृतांमध्ये ५३ पुरुष, ६५ महिला आणि १८ लहान मुलांचा समावेश असून अजून अनेक मृतदेह ढिगा-याखाली असण्याची शक्यता आहे.

ढिगा-याखालून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी ३३ मृत जनावरे बाहेर काढली. सतत कोसळणारा पाऊस आणि चिखलामुळे ढिगारा उपसण्याच्या कामात अडथळे येत आहेत. दुर्गंधी आणि रोगराईपासून बचाव करण्यासाठी येथे काम करणारे एनडीआरएफचे जवान चेह-याला मास्क लावून काम करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment