पुराव्या अभावी भारतीय अधिका-यांची सुटका

glasgow
ग्लासगो – विविध आरोपामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान दोन भारतीय अधिका-यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या दोन अधिकाऱ्यांची पुराव्या अभावी सुटका करण्यात आली आहे.

कुस्ती रेफ्री विरेंदर मलिक यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी तर आयओएचे महासचिव राजीव मेहता यांना मद्यपान करुन वाहन चालवल्या प्रकरणी ग्लासगो स्पर्धेदरम्यान अटक करण्यात आली होती.

ग्लासगो येथील न्यायालयात झालेल्या सुनवणी दरम्यान या प्रकरणी मेहता आणि मलिक यांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याचे भारतीय दुतावासातील अधिका-यांनी सांगितले.

Leave a Comment