गुगल ग्लासमुळे चोरट्याचे उद्योग उजेडात

glass
न्यूयॉर्क – गुगल ग्लासची चोरी करणार्‍या चोरट्याचे दिवसभरातील उद्योग पाहण्याचा अनोखा अनुभव माईक गेलर या पर्यटकाला आला. माईक गेलर न्यूयॉर्कमध्ये गुगल ग्लास घालून फिरत असताना एक अज्ञात व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि त्याने हा कसला चष्मा आहे असे माईकला विचारले तसेच चष्मा घालून पाहू का असेही विचारले. माईकने चष्मा देताच हा चोरटा चष्म्यासह गायब झाला.

मजा अशी की चोरट्याला साधा वाटलेला हा चष्मा प्रत्यक्षात गुगल ग्लास होती. माईक जेव्हा गुगल ग्लास घालून फिरत होता तेव्हा त्याने कॅमेरा ऑन ठेवला होता. त्यामुळे चोरटा चष्म्यासह पळाला तरी माईकच्या कॅमेर्‍याने त्याला बरोबर हेरले होते. सुरू असलेल्या कॅमेर्‍याचे रेकॉडिंग चोर थांबवू शकला नाही. गुगल ग्लासला जोडलेले लाईव्ह लेन्स सुरूच राहिल्याने चोराचा सर्व कारभार माईकला दिसत होता. त्याने पोलिसांना तशी सूचनाही दिली मात्र गुगल ग्लास कांही माईकला परत मिळू शकली नाही.

Leave a Comment