शेती पर्यटन उद्योग

sheti
शेती उद्योगाला लागून करता येणारा पण, अलीकडेच विकसित होत असलेला पूरक उद्योग म्हणजे कृषि पर्यटन उद्योग. सध्या सगळीकडेच पर्यटन व्यवसाय वाढत चालला आहे पण तसा तो कृषि व्यवसायाशी जोडूनही करता येतो. शेतातली हवा मोकळी आणि निरोगी असते पण नेहमी त्याच हवेत राहणार्‍या शेतकर्‍यांना त्या हवेचे काहीच अप्रुप वाटत नाही. शहरातल्या कोंदट हवेत राहून उबगून गेलेल्या नगर वासियांना या हवेचे कौतुक वाटते कारण त्यांना ही हवा कधी मिळत नाही. शहरातले लोक थंड आणि मोकळ्या हवेला आसुसलेले असतात. त्यासाठी ते हवा पालटाला लोणावळा, महाबळेश्‍वर अशा थंड हवेच्या ठिकाणी जात असतात. आता या थंड हवेच्या ठिकाणीही गर्दी वाढायला लागली आहे. वाहनांची लगबग सुरू झाली आहे. गर्द झाडांची जागा आता सिमेंटच्या जंगलांनी घेतली आहे. हवा प्रदूषित तर झाली आहेच पण या जागांना शहरांचे रूप येऊन त्यांचे वैशिष्ट्य नष्ट झाले आहे. अशा ठिकाणी आता पूर्वीप्रमाणे थंडावा राहिलेला नसल्याने आपण शेतातली थंड हवा या लोकांना पुरवू शकतो. शेतीचे क्षेत्र प्रचंड विस्तारलेले आहे. त्यामुळे थंड हवा, विरंगुळा आणि विश्रांती यासाठी आपण त्यांना शेतात आणू शकतो. शेतात कितीही लोक आले तरीही शेतात गर्दी होणार नाही.

महाबळेश्‍वर सारख्या ठिकाणी लॉज आणि हॉटेलांच्या मालकांनी धंदा करून पैसा कमावला आहे पण त्यांनी या नादात थंड हवा गमावली आहे. तशी स्थिती शेताची होणार नाही. पर्यटक महाबळेश्‍वरच्या ऐवजी शेतात राहणे पसंत करायला लागले आहेत. तिथे त्यांना काहीही नको आहेे. त्यांना केवळ शांतता, थंड नैसर्गिक हवा आणि रानातले वातावरण हवे आहे. त्यांना ते देऊन आपण चार पैसे कमावू शकतो. शहरातल्या वातावरणाचा कंटाळा आला आहे का, तर शेतात या, झोपडीत रहा, झाडाखाली निसर्गाने दिलेली थंड हवा खात झोपा, पाण्याच्या कालव्यातून चाला, विहिरीत उड्या मारा, पाण्यात डुंबा, झाडाला टांगलेल्या झोक्याचा आनंद लुटा, हाताने डहाळे तोडून खा, हुरड्याचा आस्वाद घ्या, शेतातल्या गोठ्यातच चुलीवर भाजलेल्या गरम गरम भाकरीची आणि झणझणीत पिठल्याची चव चाखा, महाबळेश्‍वर पेक्षा किती तरी छान. हेच तर आहे कृषि पर्यटन.

यात पर्यटकांना महाबळेश्‍वरच्या मानाने कितीतरी कमी पैसे लागतील पण त्यांच्याकडून जे पैसे मिळतील ते शेतकर्‍यांसाठी किती तरी मोलाचे ठरतील. आता हा व्यवसाय अनेक शेतकरी करायला लागले आहेत. यात ङ्गारशी गुंतवणूक नाही. मिळणारा पैसा मात्र चांगला आहे. शेतकरी निसर्गाने ङ्गटका दिला की संकटात सापडतो पण तसे झाले की हवालदिल होतो. त्यासाठी कृषि पर्यटनासारखा व्यवसाय किती तरी चांगला. मुंबईत करण्यात आलेल्या पाहणीत, ४० ते ५० टक्के लोकांचा शेतीशी काहीही संबध आलेला नाही, असे दिसून आले आहे. या लोकांना वर्षातून एक दोन दिवस शेतात येऊन राहणे आवडते. त्यांचा ङ्गायदा शेतकर्‍यांनी घेतला पाहिजे. शहरांपासून जवळ असलेल्या शेतकर्‍यांना तर हा व्यवसाय चांगलाच किङ्गायतशीर आहे.

Leave a Comment