‘मोदींच्या भाषणाने जिंकले नेपाळ’

modi
काठमांडू : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या संसदेला संबोधित करताना केलेल्या भाषणाने नेपाळवासियांची मने जिंकली असल्याचे नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी संसदेतील आपल्या भाषणाची सुरुवात नेपाळीत केली होती व निसर्ग आणि पाण्याचे नेपाळला वरदान लाभले असल्यामुळे नेपाळकडे संपूर्ण जग मोठ्या आशेने पाहत असल्याचे मोदी म्हणाले.

दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून या दरम्यान नरेंद्र मोदींनी आज नेपाळच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. नरेंद्र मोदींसाठी खास भोजन समारंभांचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी आयोजन केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामबरन यांच्या भेटीनंतर नेपाळच्या उद्योजक आणि राजकारण्यांची भेट घेणार आहेत.तब्बल 17 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर गेल्याने मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.