भारताने हॉकीमध्ये राखली लाज

hockey
ग्लासगो- ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ०-४ ने पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघाला रौप्यपदक मिळविले असून भारताने हॉकी या खेळात लाज राखीत २०१० राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणे रौप्यपदक राखू शकला. मात्र १९९८ पासून राष्ट्रकुलमध्ये राखलेली सुवर्ण घोडदौड ऑस्ट्रेलियाने कायम राखली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस सिरिएलोने (१३वे, २९वे आणि ४८वे मिनिट) असे गोल करीत हॅटट्रिक साजरी केली.

सुरुवातीच्या १२ मिनिटांमध्ये भारताने ब-यापैकी बचाव केला. मात्र नंतर ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार खेळापुढे भारताकडे उत्तरच नव्हते. भारताला सामन्यातील एकमेव पेनल्टी कॉर्नर २४व्या मिनिटाला मिळाला. मात्र वी. आर. रघुनाथने त्यावर गोल करण्याची संधी गमावली. त्यापाठोपाठ भारताला गोलच्या विशेष संधीच आल्या नाहीत. याउलट ऑस्ट्रेलियाने प्रत्येक पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेतला.

Leave a Comment