३२ वर्षानंतर बॅडमिंटनमध्येही भारताला सुवर्णपदक

p-kashyap
ग्लासगो- बॅडमिंटन एकेरीमध्ये भारताच्या पी. कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले असून अंतिम फेरीत सिंगापूरच्या वॉँगला पी. कश्यपने २१-१४, ११-२१, २१-१९ नमवले.

भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूला ३२ वर्षानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकवता आले आहे. यापूर्वी प्रकाश पादुकोन यांनी १९७८मध्ये, तर सय्यद मोदी यांनी १९८२मध्ये पुरुष एकेरीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले होते.

या सामन्यामध्ये सुरुवातीपासून कश्यपला चुकीच्या सर्व्हिस आणि वॉँगचा आक्रमक खेळ भारी पडला. त्यातून वेळीच सावरत कश्यपने पुढील दोन गुणांसह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Comment