भारताची आशियाई स्पर्धेत पेस, सानियावर दारोमदार

leander-peas
नवी दिल्ली – 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान कोरियातील इंचॉन येथे होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असून अनुभवी लिएडर पेस आणि सानिया मिर्झाकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले असून या स्पर्धेसाठी भारताचा 12 जणांचा संघ घोषित करण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय टेनिस फेडरेशनच्या निवड समितीने 12 टेनिसपटूंची घोषणा केली. यामध्ये 40 वर्षीय लिएडर पेस तसेच सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा समावेश करण्यात आला आहे. पुन्हा एकदा निवड समितीने सानिया आणि पेस यांच्यावर विश्वास दर्शविला असून यापूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेते सोमदेव देववर्मन आणि सनम सिंग यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक चार वर्षांनी भरविल्या जाणाऱया या स्पर्धेत साकेत मिनेनी आणि युकी भांब्री यांचे यावेळी पहिल्यांदाच पदार्पण होत आहे.

Leave a Comment