बॉडीबिल्डर सुहास खामकर याला अटक

suhas-khamkar
मुंबई – रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना पनवेलचे नायब तहसिलदार आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर याला आज अटक केली.

तब्बल नऊ वेळा मिस्टर इंडिया हा किताब सुहास खामकर यांनी मिळवला असून सलग तीन वर्षे भारतश्री हा किताब अनुक्रमे २०१०,२०११ आणि २०१२ या साली पटकविला होता.

सुहास खामकर याने सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुहासला आणि त्यांच्या लाचखोर साथीदारांना रंगेहाथ पकडलं आहे.

Leave a Comment