पुढील महिन्यात येणार सॅमसंगचा नवा फॅबलेट

samsung
मुंबई – स्मार्टफोनच्या विश्वात अग्रेसर असलेल्या सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या बाजारात आणण्याची मुहूर्तवेढ झाली असून सॅमसंगचा हा फॅबलेट पुढील महिन्याच्या ३ तारखेला बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे.

या फॅबलेटच्या लॉचिंगला मुहूर्त भेटत नव्हता कारण सॅमसंगची अॅपलच्या आयफोन-6शी असलेली ओढातान. पण या ओढातानीत सॅमसंगने सरशी करीत अखेर नोट-4 या फॅबलेटच्या लॉचिंगची मुहूर्तवेढ रोवली आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी नोट-4मध्ये उत्कृष्ट हार्डवेअर आहे जे की सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस5 पेक्षाही उत्तम आहे. शिवाय त्यात AMOLED 5.7 इंचाचा डिस्प्ले आहे, ते ही मेटल फ्रेममध्ये. नोट-4मध्ये अल्ट्राव्हायोलेट सेंसर आहे जे यूव्ही रेडियेशन मोजू शकतात.

गॅलॅक्सी नोट-4चे दोन मॉडेल्स सॅमसंग लॉन्च करणार आहे. एक Qualcomm Snapdragon 805 सह आणि दुसरा Exynos 5433 8 Core असलेला. यात अॅन्ड्रॉईड 4.4.3 किटकॅट आणि अॅन्ड्रॉईड 4.5 लॉलीपॉप ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

Leave a Comment