पारसकर यांना निलंबित करण्याची मागणी

sunil-paraskar
मुंबई – राज्य महिला आयोगाने एका ३४ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भातील पत्र मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे पाठवले असून या प्रकरणी राज्य महिला आयोगाने पारसकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी पारसकर यांना जो पर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत निलंबित करावे असे म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये जर पारसकर पदावर राहिले तर अडथळे येऊ शकतात असे मारिया यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment